Advertisement

वरळीतील 'या' मैदानाचा कायापालट

अवघ्या ४ महिन्यांत महापालिकेने या मैदानात तब्बल १५ हजार चौरस फुटांचे एक स्वतंत्र क्रीडांगण विकसित केले आहे.

वरळीतील 'या' मैदानाचा कायापालट
SHARES

वरळीतील बीडीडी चाळींच्या परिसरातील असलेल्या प्रसिद्ध जांबोरी मैदानाचा महापालिकेनं कायापालट केला आहे. अवघ्या ४ महिन्यांत महापालिकेने या मैदानात तब्बल १५ हजार चौरस फुटांचे एक स्वतंत्र क्रीडांगण विकसित केले आहे. वरळीतील ‘महात्मा गांधी मैदान’ म्हणजेच ‘जांबोरी मैदाना’चे पालिकेचा जी दक्षिण विभागानं विकास केला आहे.

या जांबोरी मैदानात कबड्डी, बॅडिमटनसह इतरही खेळांसाठीच्या खेळपट्ट्या, धावपट्ट्या, लहान मुलांसाठी स्वतंत्र स्केटिंग ट्रॅक, पदपथ, लाकडी उपकरणे असणारी खुली व्यायामशाळा अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील या मैदानाचा विकास जिल्हा नियोजन समितीच्या व पालिकेच्या निधीतून करण्यात आलं.

राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या या मैदानात दीड कोटी रुपयांच्या संयुक्त निधीमधून विविध विकासकामे करण्यात आली आहेत.

या मैदानात लवकरच खुले वाचनालय व त्यावर प्रेक्षक गॅलरी, योग केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा, लहान मुलांसाठी खेळणी इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे समजतं.

मैदानातील सुविधा

  • तब्बल १ लाख ४५ हजार चौरस फुटांच्या मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना धुळीचा त्रास होऊ नये यासाठी १४ ठिकाणी पाण्याचे फवारे बसविण्यात आले आहेत.
  • त्याद्वारे निर्धारित वेळी मैदानात पाणी फवारण्यात येत असून यामुळे मैदानात ओलावा राहतो.
  • लाकडी उपकरणे असलेली खुली व्यायामशाळा असून डंबेल्स, वेटलिफ्टिंग, पूल-अप्स आदी उपकरणांचा त्यात समावेश आहे.
  • मैदानालगत खुले योग केंद्र उभारण्यात येत असून याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या योग केंद्रात एका वेळी सुमारे ३० व्यक्ती योगाभ्यास करू शकतील.
  • मल्लखांब या भारतीय खेळाचा सराव करण्यासाठी आवश्यक ते साहित्य लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार.
  • मैदानात ५,१०० चौरस फुटांपेक्षा अधिक आकाराचे मल्टी-स्पोर्टस् रबरमॅट कोर्ट उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा