रस्त्यामध्ये थ्री फेजचा अडथळा

 Chembur
रस्त्यामध्ये थ्री फेजचा अडथळा
रस्त्यामध्ये थ्री फेजचा अडथळा
See all

चेंबूर - चेंबूर अयोध्यानगर येथील वाशीनाका परिसरातील रस्त्यांच्या मध्यभागी थ्री फेजची लाईन बसवण्यात आली आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा होत आहे.

अयोध्या नगर, वाशीनाका, चेंबूर येथे रस्त्याच्या मधोमध थ्री फेजची लाईन आहे. रहदारीचा रस्ता असल्याने व बाजूला शाळा असल्यामुळे येथून वाहनांची व शाळेतील मुलांची ये जा सुरू असते. पण येथील रस्त्यावर प्रकाशदिवे नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या मधोमध असलेले वीज उपकेंद्रें आणि थ्री फेज सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तरीदेखील रिलायन्स एनर्जी, राजकीय नेत्यांकडून याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.

Loading Comments