Advertisement

कल्याणमध्ये होणार पहिली ऑनलाईन निवडणूक

कल्याणमध्ये ऑनलाइन निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही राज्यातील पहिली ऑनलाइन निवडणूक असणार आहे.

कल्याणमध्ये होणार पहिली ऑनलाईन निवडणूक
SHARES

गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळापासून देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात हळूहळू सर्व सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र यामध्येही पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. त्यामुळे कल्याणमध्ये ऑनलाइन निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही राज्यातील पहिली ऑनलाइन निवडणूक असणार आहे.

केडीएमसीचे परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांचा एक वर्षाचा कालावधी मार्चमध्ये संपुष्टात आला आहे. मात्र राज्यभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावात नव्या सभापतीची निवड होऊ शकलेली नाही. ही रखडलेली निवडणूक आता ऑनलाइन प्रक्रियेद्वारे होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच अशाप्रकारे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीनं निवडणूक होणार आहे.

कोकण विभागाचे विभागीय आयुक्त लौकेश चंद्र यांनी पीठासीन अधिकारी म्हणून पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची नियुक्ती केली आहे. निवडीची सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घ्यावी, असं स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. दरम्यान ही राज्यातील पहिलीच ऑनलाइन निवडणूक ठरणार आहे. निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार असून कोकण विभागीय आयुक्तांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना सुद्धा पत्र पाठवलं आहे.



हेही वाचा

Covid-19 In Mumbai: मुंबईत १०० टक्के लाॅकडाऊनची गरज नाही, महापालिका आयुक्तांनी केला खुलासा

प्रत्येक जिल्ह्यात उभारणार कोरोना चाचणी प्रयोगशाळा- उद्धव ठाकरे


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा