Advertisement

नवी मुंबईतील परिवहन सेवा संपूर्णपणे इलेक्ट्रिक होणार

नवी मुंबई महानगर पालिकेनं आणखी एक पर्यावरण पूरक निर्णय घेतला आहे.

नवी मुंबईतील परिवहन सेवा संपूर्णपणे इलेक्ट्रिक होणार
SHARES

नवी मुंबई महानगर पालिकेनं आणखी एक पर्यावरण पूरक निर्णय घेतला आहे. हा निर्णय आता नवी मुंबई शहरातील परिवहन सेवा पूर्णता पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे. काही काळातच नवी मुंबई परिवहन सेवेत असलेल्या सर्वच ४५० बसेस इलेक्ट्रिक होणार आहेत.

सद्या परिवहन सेवेत १८० इलेक्ट्रिक बस असून महिनाभरात आणखी नवीन ५० इलेक्ट्रिक बस येणार आहेत. त्याच बरोबर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीनं पुढील सहा महिन्यात अजून १०० इलेक्ट्रिक बसची भर देखील पडणार आहे. हे पाहता इलेक्ट्रिक बसची संख्या थेट ३५० च्या घरात जाणार आहे.

इलेक्ट्रिक बस सेवेत आल्यास वर्षाला डिझेल, सीएनजीचा होणारा ६५ ते ७० कोटींचा खर्च वाचणार आहे. त्याच बरोबर शहरातील प्रदूषण कमी होण्यास देखील मोठ्या प्रमाणात मदत होईल. त्यामुळे देशातील नवी मुंबई हे एकमेव शहर असेल ज्याची संपूर्ण परिवहन सेवा इलेक्ट्रिक बसवर अवलंबून असणार आहे.

नवी मुंबई महानगर पालिकेने काही दिवसांपूर्वीच लेट्स रीड फाउंडेशनच्या (Lets Read Foundation) सहकार्यानं एका अभिनव उपक्रमाची सुरुवात केली होती. या उपक्रमान्वये नवी मुंबई मनपा परिवहन उपक्रमाच्या बसेसमध्ये (Navi Mumbai Municipal Transport) आता ग्रंथालयाची स्थापना करण्यात येणार आहे.

ज्या बसेस (NMMT Bus) लांब पल्याच्या मार्गिकेवर धावतात त्या बसेसमध्ये प्रवास करणाऱ्यांकरता ही ग्रंथालयाची सुविधा करण्यात येणार आहे.



हेही वाचा

मुंबईतील रात्रीची संचारबंदी पालिकेनं हटवली

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं 'शिवशाही'चा प्रवास ठरतोय असुरक्षित?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा