Advertisement

मुंबईतील रात्रीची संचारबंदी पालिकेनं हटवली

राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

मुंबईतील रात्रीची संचारबंदी पालिकेनं हटवली
SHARES

गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. कोरोना रुग्णसंख्या घटल्यानं मुंबईतील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार आजपासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून, मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच मुंबईतील समुद्र किनारे, गार्डन, पार्क खुले होणार आहेत. याशिवाय स्विमींग पूल, वॉटर पार्क, थिम पार्क ५० टक्के क्षमतेनं सुरू होणार आहेत.

ओमिक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारनं घेतला. मुंबईतील रुग्णसंख्या दोन दिवसापासून हजाराच्या आत आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या आता नियंत्रणात आल्याने मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

लग्नसोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नव्या नियमावलीनुसार, काय बंद, काय सुरू?

  • पर्यटनस्थळे, आठवडी बाजार, समुद्रकिनारे, गार्डन, पार्क सुरु राहणार
  • अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेनं सुरु होतील.
  • हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची 50 टक्के क्षमतेनं सुरू
  • लग्नसोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी
  • भजन, धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांना ५० क्षमतेनं परवानगी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा