आता जी. टी. रुग्णालयात होणार स्वस्तात उपचार

Fort
आता जी. टी. रुग्णालयात होणार स्वस्तात उपचार
आता जी. टी. रुग्णालयात होणार स्वस्तात उपचार
See all
मुंबई  -  

आता तुम्हाला त्वचेवरील चामखिळ, मुरमाचे डाग, शस्त्रक्रियेचे व्रण आणि पोटावरील स्ट्रेच मार्क्स यांच्यावर उपचार करायचे असतील आणि ते ही अगदी स्वस्तात तर, तुम्ही गोकुळदास तेजपाल रुग्णालयाचा पर्याय नक्कीच वापरू शकता. कारण, शुक्रवारी या सरकारी रुग्णालयात त्वचा आणि गुप्तरोग विभागांर्तगत लेझर उपकरणे आणि शल्यचिकित्सा विभागात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यासाठी दोन अत्याधुनिक उपकरणांचे उद्घाटन सर. जे. जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

त्वचेच्या समस्या आपल्या सर्वांनाच असतात. पण, त्याच्यावर कमी खर्चात उपचार व्हावे हाच या मागचा उद्देश असल्याचे गोकुळदास तेजपाल रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. मुकुंद तायडे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी असे उपचार केवळ खासगी रुग्णालयातच उपलब्ध होते. असे उपचार खर्चिक असल्याकारणाने सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहेत. पण, आता हे उपकरण शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाल्याने याचा फायदा नक्कीच कमी खर्चात रुग्णांना घेता येणार असल्याचेही तायडे यांनी स्पष्ट केले आहे.


लेझर मशीन ही कोरिया निर्मित असून याचा उपयोग त्वचेवरील चामखिळ, मुरमाचे डाग, शस्त्रक्रियेचे व्रण आणि पोटावरील स्ट्रेच मार्क्स या उपचारांसाठी होणार आहे. आतापर्यंत 5 जणांनी ही ट्रिटमेंट घेतली आहे

- डॉ. उषा हेमानी, पथक प्रमुख, जी. टी. रुग्णालय

शस्त्रक्रियेचे टाके पडू नयेत आणि रुग्णालयातील वेळ कमी करण्याच्या दृष्टीने दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याकडे जास्त कल आहे, तरी त्यासाठी लागणारी अत्याधुनिक लॅप्रोस्कोपीक उपकरणे आता गोकुळदास तेजपाल रुग्णालयात उपलब्ध झाली आहे,  

- डॉ. जितेंद्र सकपाळ,  पथक प्रमुख, जी. टी. रुग्णालय


किती येणार खर्च?

या मशीनचे नाव लेझर टोनिंन असे आहे. फक्त एका वेळच्या ट्रिटमेंटसाठी खासगी रुग्णालयात जवळपास 3 ते 5 हजार रुपये एवढे पैसे मोजावे लागतात. पण, जी. टी रुग्णालयात एका वेळच्या ट्रिटमेंटसाठी फक्त 200 रुपये मोजावे लागणार आहेत. तुमच्या चेहऱ्यावर असणारे खड्डे किंवा बारीक बारीक पुळ्या घालवण्यासाठी या लेझर ट्रिटमेंटचा जास्त उपयोग होणार आहे आणि पोटावरच्या डिलीव्हरीच्या टाक्यांवर या ट्रिटमेंटचा 40 ते 50 टक्के फायदा होणार आहे. ही ट्रिटमेंट तुम्हाला महिन्यातून एकदा करावी लागणार आहे. जोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावरचे व्रण कमी होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही ट्रिटमेंट घ्यावी लागेल. तसेच दारिद्र्य रेषेखालील, राजीव गांधी योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णांना ही ट्रिटमेंट मोफत असेल.  मग, जर तुम्ही जी. टी रुग्णालयात आपल्या चेहऱ्याच्या समस्येसाठी उपचार घेतलेत तर, तुम्हाला 5 वेळच्या ट्रिटमेंटसाठी फक्त 1000 रुपये मोजावे लागतील. पण, खासगी रुग्णालयात याच ट्रिटमेंटसाठी फक्त एका वेळच्या ट्रिटमेंटसाठी जवळपास 3 ते 5 हजार रुपये मोजावे लागतात.  


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.