Advertisement

पोलिस आयुक्तालयात झाड कोसळलं, दोन गाड्यांचं नुकसान


पोलिस आयुक्तालयात झाड कोसळलं, दोन गाड्यांचं नुकसान
SHARES

फोर्ट येथील पोलिस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीतील पार्किंग परिसरात दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास झाडं कोसळलं. यात पोलिस अधिकाऱ्यांच्या २ गाड्यांचं मोठं नुकसान झालं. या दुर्घटनेत वाहन चालक अभिजीत आव्हाड थोडक्यात बचावल्याची माहिती आहे.


दुर्घटनांचं सत्र सुरूच

मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात अंधेरी रेल्वे स्थानकानजीकच्या रुळावर गोखले पुलाचा काही भाग कोसळला. त्यानंतर कमला मिल परिसरात आग लागली, विरार स्थानकात उभ्या असलेल्या लोकलला शाॅर्टसर्कीटमुळं आग लागली, मिरारोड स्थानकातील तिकीट घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं, वांद्रयातील नाल्यात एक जण वाहून गेला.



मंगळवारचं हे दुर्घटनांचं सत्र बुधवारीही सुरूच असल्याचं दिसत आहे. बुधवारी सकाळीच ग्रँट रोड पुलाला तडे गेल्यावर पोलिस आयुक्तालयातील पार्किंग परिसरात झाडं कोसळलं.

या दुर्घटनेत ज्या दोन गाड्यांचं नुकसान झालं, त्यातील एक गाडी आयपीएस अधिकारी रवींद्र शिवसे यांची असल्याचं समजतं आहे. दरम्यान अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी रवाना झाली असून झाडं हटवण्याचं काम सुरू आहे.



हेही वाचा-

ग्रँट रोड पुलावर तात्पुरती मलमपट्टी, नागरिक संतप्त

अंधेरीचा गोखले पूल बंद, 'या' मार्गावरून करा प्रवास



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा