चेंबूरमध्ये झाड कोसळून घराचे नुकसान

 Chembur
चेंबूरमध्ये झाड कोसळून घराचे नुकसान
चेंबूरमध्ये झाड कोसळून घराचे नुकसान
See all

चेंबूर नाका येथील राजाराम नगरात एका घरावर 25 ते 30 वर्ष जुने पिंपळाचे झाड कोसळल्याची घटना रविवारी पहाटे घडली. 

ज्या घरावर हे झाड कोसळले, त्या घराचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. स्थानिक नगरसेविका अाशा मराठे यांना ही बाब समजातच त्यांनी तत्काळ अग्निशमन दल आणि पालिकेला घटनेची माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत हे झाड बाजूला केले आहे.

Loading Comments