चर्नी रोड परिसरात ट्रक थेट मॅनहोलमध्ये घुसला


  • चर्नी रोड परिसरात ट्रक थेट मॅनहोलमध्ये घुसला
SHARE

डॉ. अमरापूरकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मॅनहोलनंतर आजही मुंबईच्या रस्त्यावरील अनेक मॅनहोल नादुरुस्त आहेत. याचेच प्रत्यय चर्नी रोड येथील समतानगर हरी गद्रे चौक येथील राजा राम मोहन रॉय मार्गावर आला.

चर्नी रोड येथील राजा राम मोहन रॉय या मार्गावर सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास रेतीने भरलेला एक ट्रक चक्क मॅनहोलमध्ये घुसला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण सकाळी रहदारीच्या वेळी प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. 


एकीकडे मुंबई मेट्रो तीनचे काम तर दुसऱ्या बाजूला हा अपघात यामुळे इथल्या रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
- श्रीधर माने, स्थानिक रहिवासी


गेले कित्येक दिवसांपासून ट्रक चालवतो पण, अशी घटनी कधीच घडली नाही. सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास अचानक गाडीचा मागचा भाग मॅनहोलमध्ये घुसला. मॅनहोलचे झाकण नादुरुस्त असल्याने ट्रकचा तोल गेला.
- धर्मेश यादव, ट्रकचालक 


हेही वाचा - 

डाॅ. अमरापूरकरानंतर कुणाचा जीव घेणार? जलवाहिन्यांच्या व्हॉल्वचे चेंबर तुटकेच


संबंधित विषय
ताज्या बातम्या