डाॅ. अमरापूरकरानंतर कुणाचा जीव घेणार? जलवाहिन्यांच्या व्हॉल्वचे चेंबर तुटकेच


  • डाॅ. अमरापूरकरानंतर कुणाचा जीव घेणार? जलवाहिन्यांच्या व्हॉल्वचे चेंबर तुटकेच
  • डाॅ. अमरापूरकरानंतर कुणाचा जीव घेणार? जलवाहिन्यांच्या व्हॉल्वचे चेंबर तुटकेच
  • डाॅ. अमरापूरकरानंतर कुणाचा जीव घेणार? जलवाहिन्यांच्या व्हॉल्वचे चेंबर तुटकेच
SHARE

डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मॅनहोलनंतर आता मुंबईतील जलवाहिन्यांचे व्हॉल्व असलेल्या चेंबरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये रस्त्यांखालील जलवाहिन्यांच्या व्हॉल्वचे चेंबर तथा मॅनहोल तुटलेल्या किंवा ना दुरुस्त अवस्थेत आहेत. मात्र, हे तुटलेले चेंबर दुरुस्त करण्याकडे महापालिकेच्या जलअभियंता विभागाचे लक्षच नसल्याचे दिसत आहे. शिवाय या चेंबरची दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटदार नसल्याचे सांगत महापालिका हात वर करत आहे. त्यामुळे या तुटक्या चेंबरमध्ये पडून आणखी एखाद्याने जीव गमावण्याची वाट महापालिका पाहतेय का? असा सवाल मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे.


या रस्त्यांवर तुटके चेंबर

सांताक्रूझ पूर्वेकडील सीएसटी रोड, शीव-पनवेल रोडवरील देवनार येथे टेलिकॉम फॅक्टरी जवळ, साकिनाका मेट्रो रेल्वे स्टेशन, नाना चौक, ग्रँट रोड, वांद्रे- कुर्ला संकुल, मानखुर्द ९० फूट रोडवरील पीएमजीपी कॉलनी जवळ जल वाहिन्यांच्या चेंबरची झाकणे तुटलेली आहेत.जबाबदारी जल अभियंता विभागाची

या तुटक्या चेंबरमध्ये गाडीचे चाक आल्यास गाडीला मोठा दणका बसतो, तर कधी पादचारी या चेंबरमध्ये पाय जाऊन अडखळतात. यापैकी बऱ्याच चेंबरच्या ठिकाणी काठीला लाल कपडा गुंडाळून धोक्याची सूचना दिली आहे. तर काही ठिकाणी चेंबरचा भाग खचून झाकण दबल्याने येथे कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते. यासंदर्भात देखभाल व दुरुस्ती विभागाकडे चौकशी केली असता, त्यांनी हे काम जल अभियंता विभागाचे असल्याचे सांगितले.निविदा तयार, पण...

जल अभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी चेंबर दुरुस्तीचे कंत्राट मार्च २०१७ मध्ये संपुष्टात आल्याचे सांगितले. त्यामुळे सध्या कंत्राटदार नाहीत. या कामासाठी तयार निविदा झालेली आहे, परंतु अद्याप वरच्या स्तरावर निर्णय न झाल्यामुळे या निविदा स्थायी समितीच्याही मंजुरीला गेलेला नाही. त्यामुळे जोवर कंत्राटदार नियुक्त होत नाही, तोवर आम्हाला या चेंबरच्या दुरुस्तीचे काम हाती घेता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.उपायुक्त रमेश बांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जलवाहिन्यांच्या चेंबरची दुरुस्ती ही जलअभियंता विभागामार्फतच केली जाते. अनेकदा रस्त्यांचे डांबरीकरण करताना या चेंबरचे बांधकाम नियमाप्रमाणे समपातळीत केले जात नाही. त्यामुळे ते असमांतर पातळीत दिसते. ते बऱ्याचदा खचलेले दिसते. परंतु अशाप्रकारे जर चेंबरचे झाकण तुटलेले असेल, तर त्वरीत दुरुस्त करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.हेही वाचा -

फायबरच्या झाकणाने घेतला अमरापूरकरांचा जीव?

अमरापूरकर मृत्यू प्रकरण : सिंघल समितीची महापालिकेला क्लिनचिटडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या