Advertisement

रेशनवर तूरडाळ ३५ रुपये किलोनं मिळणार


रेशनवर तूरडाळ ३५ रुपये किलोनं मिळणार
SHARES

मुंबई, ठाण्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी एक गुड न्यूज अाहे. अाता रेशनवर तूरडाळ प्रतिकिलो ३५ रुपये दरानं मिळणार अाहे. शासन निर्णयानुसार यापूर्वी अधिकृत शिधावाटप दुकानातून तूरडाळ ५५ रुपये प्रतिकिलोनं उपलब्ध करून देण्यात अाली होती. मात्र सध्याचे तूरडाळीचे बाजारातील दर लक्षात घेऊन विक्रीदरामध्ये ३५ रुपये प्रतिकिलो अशी सुधारणा करण्यात अाली अाहे.


सरकारकडे तूरडाळ पडून

आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०१६-१७ मध्ये सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांकडून हमीभावानं तूरडाळ खरेदी केली होती. मोठ्या संख्येनं ही तूरडाळ खरेदी केल्यानं ती सरकारी गोदामांमध्ये पडून अाहे. तूरडाळीचा हा साठा संपवण्यासाठी सरकारनं तूरडाळीची स्वस्त दरानं विक्री करण्याचा निर्णय शासनानं यापूर्वीच घेतला होता.


सर्वांच्या फायद्याचा निर्णय

मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात प्रति किलो ३५ रुपये दरानं एक किलोच्या पाकिटांमध्ये सर्व अधिकृत शिधावाटप दुकानातून तूरडाळ सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना व इतर सामान्य नागरिकांना मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहे. डाळीचा दर्जा, त्यामधील पोषकतत्त्वे व किंमत या बाबींचा विचार करण्यात अाला अाहे. त्याचबरोबर सामान्य कार्डधारकांचे व जनतेचे हित लक्षात घेऊन तसंच तूर उत्पादक शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे.



हेही वाचा -

बॅण्डस्टॅण्ड समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फिन

बाप्पाला थर्माकोलची सजावट नाहीच! उच्च न्यायालयाकडून बंदी कायम



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा