Advertisement

खासदार परेश रावल सोशल मिडियावर "ट्रोल"

चुकीच्या सूत्राच्या मदतीने परेश रावल यांनी मोदी आणि दिदी यांचे गणित सोडवण्याचा सोशल मिडियावर प्रयत्न केला. तसेच हे चुकीचे समीकरण त्यांनी ट्विटरवर ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना लक्ष केले.

खासदार परेश रावल सोशल मिडियावर "ट्रोल"
SHARES

भाजपाचे खासदार आणि अभिनेता परेश रावल यांना सोशल मिडियावर सध्या नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. चुकीच्या सूत्राच्या मदतीनं परेश रावल यांनी मोदी आणि दीदी यांचे गणित सोडवण्याचा सोशल मिडियावर प्रयत्न केला. तसंच हे चुकीचे समीकरण त्यांनी ट्विटरवर ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना लक्ष केलं.

परेश रावल पून्हा 'ट्रोल'

कोलकाता पोलीस आयुक्तांच्या सीबीआय चौकशीविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धर्मतल्लामध्ये धरणे आंदोलन केलं. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं कोलकाता पोलीस आयुक्तांना सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर रहावे, असे आदेश पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना दिले. या सर्व नाट्यमय घडामोडीला अनुसरून परेश रावल यांनी ट्विटरवर चुकीचे गणिती सुत्र वापरले. परेश रावल यांनी मोदी/दीदी = मोदी, असा हिशोब लावला. मात्र, याचे गणिती भाषेत उत्तर मो/दी असे होते. म्हणजेच जर ab/cb = a/c होतं ac नाही.

या ट्वीटमुळे परेश रावल यांना नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले. रावल यांच्या ट्विटवर एकानं 'तुम्ही थोडे शिकला असता. तर आज तुम्हच्यावर ही वेळ आली नसती' अशी कमेंट केली आहे. याआधीही सोशल मीडियावर परेश रावल चुकीची माहिती टाकल्यामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर होते. त्यावेळी ही  नेटकऱ्यांनी त्यांचा असाच समाचार घेतला होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा