पाली-भुतीवली धरणात बुडून दोघांचा मृत्यू


SHARE

कुटुंबासोबत पिकनीकसाठी गेलेल्या दोन जणांचा पाली-भुतीवली धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोफाअली मुस्ताकअली नाईक (२२) आणि आमनअली शेख (१७) अशी या दोघांची नावं असून हे दोघे विक्रोळी येथे राहणारे होते.


आणि ते बुडाले

सोफाअली नाईक आणि आमनअली शेख दोघेही आपल्या कुटुंबियांसोबत रविवारी 29 जुलैला कर्जत तालुक्यातील पाली-भुतीवली धरण येथे पिकनीकसाठी गेले होते. त्यावेळी मौजमजा करत असताना या दोघांनी धरणात पोहोण्यासाठी उडी मारली. मात्र, धरणातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे दोघेही बुडाले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या