सीएसटीवर दोन रेल्वे महिला अधिकाऱ्यांमध्येच जुंपली

  CST
  सीएसटीवर दोन रेल्वे महिला अधिकाऱ्यांमध्येच जुंपली
  मुंबई  -  

  दोन महिला रेल्वे अधिकाऱ्यांमध्येच मारहाण झाल्याची घटना मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर घडली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार मोबाइलमध्ये कैद झाला आहे.

  छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या रेल्वे मुख्यालयात सोमवारी दुपारी हा प्रकार घडला असून प्राथमिक माहितीनुसार काळ्या गणवेशातील महिलेचं नाव ॲड. डेलिला फर्नांडिस आहे, ती रल्वेच्या तक्रार निवारण समितीची वकील आहे. तर मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव स्वाती सिन्हा असल्याचं समजतय. स्वाती सिन्हा मध्य रेल्वेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे.

  ही मारहाण सुरू असताना कामावर असलेल्या पुरुष हवालदाराने तात्काळ महिला पोलीसाला बोलवून झटापट सोडवली.

  दरम्यान मारहाण करणाऱ्या महिला अधिकाऱ्यावर तात्काळ करवाई करा, अन्यथा रेल्वे क्लेम्स ट्रिब्यूनल बार असोसिएशन संप करेल आणि कोर्टात जाईल असा इशारा बार असोशिएशनने केला आहे.

  रेल्वे अधिकारी स्वाती सिन्हा या आधीसुद्ध वादात सापडल्या होत्या जेव्हा तिने मराठीतून दिलेल्या आरटीआय अर्जाच उत्तर देण्यास नकार दिला होता त्यावेळेला मनसे कार्यकर्त्यांच्या रोषाला तिला सामोरे जावे लागले होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.