आरे कॉलनीतील विहिरीत बुडून २ तरूणींचा मृत्य


SHARE

गोरेगाव येथील आरे कॉलनीत विहीरीत उडी मारून दोन मुंलींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुनिता किशन (१७) आणि प्रविणा गणपत रावते (१७) अशी या मुलींची नावं आहेत. प्रेमभंगामुळे या दोघींनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.


सेल्फी काढून पाठवला मेसेज

मंगळवारी संध्याकाळी ८.३८ वाजेच्या सुमरास ही घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी दोघींनी मोबाईलवर सेल्फी काढला आणि तो मित्रमैत्रिणींना पाठवला. यातील एकीने विहिरीलगत काढलेला सेल्फी भावालाही पाठवला होता. ‘आम्ही आत्महत्या करत आहोत’, असा मेसेजही त्यांनी फोटो पाठवताना केला होता, असं समजतं आहे.


दोघींना केलं मृत घोषित

या घटनेनंतर स्थानिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना कळवलं असता अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या दोघींना विहिरीतून बाहेर काढून सिद्धार्थ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारापूर्वीच या दोघींचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या