Advertisement

खड्ड्यांमुळं 'या' महामार्गावर दुचाकीस्वारांचे सर्वाधिक अपघात

रस्त्यावर अनेक ठिकाणी खडबडीत झाल्यानं या मार्गावर दुचाकीस्वारांचे रोज अपघात होत आहेत.

खड्ड्यांमुळं 'या' महामार्गावर दुचाकीस्वारांचे सर्वाधिक अपघात
SHARES

मुंबईत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळं अपघात (accidents) होण्याचं प्रामाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. विशेष म्हणजे ठाणे आणि मुंबईला जोडणारा पूर्व द्रुतगती महामार्ग अनेक ठिकाणी खडबडीत झाल्यानं वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खडबडीत झाल्यानं या मार्गावर दुचाकीस्वारांचे (two wheeler accidents) रोज अपघात होत आहेत.

मुंबई शहरातील महत्त्वाच्या महामार्गापैकी एक असलेल्या पूर्व द्रुतगती महामार्गावर सध्या मेट्रोचं (metro) काम सुरू आहे. या कामामुळं रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी पत्रे लावण्यात आले आहेत. तसंच, घाटकोपर उड्डाणपुलाला जोडून अन्य एका उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. या सर्व कामांमुळं एकीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय, रस्त्यावर लहान-लहान खड्डे तयार झाल्यानं याचाही वाहतूक कोंडीवर (traffic jam) मोठा परिणाम होत आहे.

अवजड आणि लहान वाहनांसह या मार्गावर दुचाकीस्वरांची संख्या मोठी आहे. त्यामुळं या मार्गावर असलेले लहान खड्डे या दुचाकीस्वारांसाठी घातक ठरत आहेत. वाहतूक कोंडी नसल्यावर या मार्गावरून दुचाकी अतिवेगानं जातात. मात्र, याच वेळी अनेकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.

अपघात झाल्यानंतर वाहतूक पोलीसच जखमी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करतात. शिवाय अपघातामुळे बराच वेळ वाहतूकही ठप्प होत असल्यानं याचा मोठा त्रास वाहतूक पोलिसांनाच सहन करावा लागत आहे. त्यामुळं वाहतूक पोलिसांनी अनेकदा हे खड्डे भरण्यासाठी एमएमआरडीएला तक्रारी दिल्याचं समजतं.



हेही वाचा -

कोरोनामुळं व्यायामशाळेकडं सभासदांची पाठ

भारतीय वन्यजीव संस्था करणार ऑलिव्ह रेडली कासवांवर अभ्यास


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा