अनधिकृत दुकानांवर पालिकेची कारवाई

 Crawford Market
अनधिकृत दुकानांवर पालिकेची कारवाई

मस्जिद बंदर - येथील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील 15 अनधिकृत गाळ्यांवर पालिकेने कारवाई केली. पालिका कर्मचाऱ्यांनी सर्व सामान जप्त करत ही कारवाई केली. बी विभागाचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांनी ही तोडक कारवाई केली. तसेच नो पार्किंग झोनमधील गाळ्यांवर देखील यावेळी कारवाई करण्यात आली. अनेक दिवसांपासून या अनधिकृत गाळे धारकांनी इथे बस्तान बसवले होते. त्यामुळे रस्ता नेमका कुणासाठी असा सवाल उपस्थित झाला होता. मात्र सोमवारी अचानक ही कारावाई झाल्याने रस्ता आणि फुटपाथ मोकळा झाला.

Loading Comments