Advertisement

अंधेरीत १२व्या मजल्यावरून पडून युक्रेनच्या तरुणीचा मृत्यू

युक्रेनहून बिझनेस व्हिसावर भारतात आलेल्या तरुणीचा १२व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अंधेरीत १२व्या मजल्यावरून पडून युक्रेनच्या तरुणीचा मृत्यू
SHARES

युक्रेनहून बिझनेस व्हिसावर भारतात आलेल्या तरुणीचा १२व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात बुधवारी ही घटना घडली. अहसेन दुब्येना असं या तरुणीचं नाव असून हा अपघात आहे, आत्महत्या आहे की अन्य काही याबाबत डी. एन. नगर पोलिस तपास करीत आहेत.

अहसेन ही २ दिवसांपूर्वीच मुंबईत आली होती. ती अंधेरीच्या मिलेनियर हेरिटेज सोसायटीत पेयिंग गेस्ट म्हणून राहत होती. मंगळवारी रात्री उशिरा ती १२व्या मजल्यावर मित्रांसोबतपार्टी करीत होती. पार्टीत सर्वांनी मद्यप्राशन केलं होतं. पहाटेच्या सुमारास अहसेन तोल जाऊन १२व्या मजल्यावरून पडल्याची माहीती तिच्या मित्रांनी पोलिसांना दिली.

डी. एन. नगर पोलिस घटनास्थळी पोहचले. अहसेनला कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डी. एन. नगर पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करून याबाबतची माहीती युक्रेन दुतावासाला दिली. नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तिच्यासोबतच्या मित्रांना ताब्यात घेतले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा