Advertisement

कोरोनाच्या उपचारात गडबड घोटाळा, उल्हासनगरमधील 'या' रुग्णालयाला नोटीस

लाखो रुपयांची बिलं रुग्णांवर लादली जात आहेत. अशा रुग्णालयांवर प्रशासनही कारवाई करत आहे.

कोरोनाच्या उपचारात गडबड घोटाळा, उल्हासनगरमधील 'या' रुग्णालयाला नोटीस
SHARES

खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचाराच्या नावाखाली रुग्णांना लुबाडल्याच्या अनेक घटना कानावर आल्या असतील. लाखो रुपयांची बिलं रुग्णांवर लादली जात आहेत. अशा रुग्णालयांवर प्रशासनही कारवाई करत आहे. आता अशीच एक घटना उल्हानगरमधून समोर आली आहे.

कोरोनासाठी वापरण्यात येणाऱ्या PPEकिटमध्ये घोटाळा आणि रूग्णाला रूग्णालयात जबरदस्ती दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोप उल्हासनगर इथल्या एका रुग्णालयावर करण्यात आला आहे. यामुळे उल्हासनगर मनपानं श्रीदेवी हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

हेही वाचा : कल्याण डोंबिवलीमध्ये २०१ नवे रुग्ण

उल्हासनगर महानगर क्षेत्रात कोरोनाचे केवळ ५२० रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. उल्हानगरमधील कोरोना रूग्णांचा बरे होण्याचा दर ९१.३६ आहे. त्यापैकी २४३ रुग्ण शहराबाहेरील रूग्णालयात उपचार घेत आहेत. ४१ रुग्ण घरातच क्वारंटाईन आहेत. तर खासगी आणि सरकारी रुग्णालयात १७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सोमवारी कोरोनानं दोन रुग्णांचा मत्यू झाला आहे. त्यामुळे अल्हासनगरमधील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा १५९ झाला आहे. तर ८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या कोरोना रुग्णांचा आकडा ६ हजार ५४७ च्या घरात गेला आहे. सोमवारी एकूण २९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आता कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ७ हजार १६६च्या वर गेला आहे.हेही वाचा

धारावीत १० दिवसांत एकही मृत्यू नाही

मुंबईत कोरोनाचे ९२५ नवे रुग्ण, ४६ जणांचा दिवसभरात मृत्यू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा