Advertisement

उल्हासनगर : कोरोनाग्रस्त रुग्णावर अंत्यसंस्कार, आता परिसरात माजलाय हाहाकार

उल्हासनगरमधल्या एका कुटुंबियांनी डॉक्टरांच्या सुचनांना पायदळी तुडवलं आणि नको ते घडलं. कुटुंबियांच्या चुकिमुळे पूर्ण परिसर झाला कंन्टेंमेंट झोन.

उल्हासनगर : कोरोनाग्रस्त रुग्णावर अंत्यसंस्कार, आता परिसरात माजलाय हाहाकार
SHARES

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ५ पेक्षा जास्त लोकांना आता जाता येणार नाही. तसे आदेशच यापूर्वीच देण्यात आले आहेत. शिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह काही विशिष्ट प्रक्रिया करुन प्लास्टिक बॅगमध्ये बंद केला जातो. त्यानंतरच तो अंत्यसंस्कारासाठी दिला जातो. पण उल्हासनगरमधल्या एका कुटुंबियांनी डॉक्टरांच्या सुचनांना पायदळी तुडवलं आणि नको ते घडलं. कुटुंबियांच्या चुकिमुळे पूर्ण परिसर झाला कंन्टेंमेंट झोन.

उल्हासनगरमधल्या खन्ना कंपाऊंडमध्ये राहणाऱ्या एका ५७ वर्षीय वक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणं होती. त्यामुळे त्याची स्वॅब कलेक्शन घेण्यात आले. पण नेमका उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉकटरांनी मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून दिला होता. शिवाय प्लास्टिकमधून मतदेह बाहेर न काढण्याच्या सुचनाही केल्या होत्या. पण डॉक्टरांच्या सुचनांना पायदळी तुडवून कोरोनाबाधित मृतदेहाला प्लास्टिक मधून बाहेर काढून आंघोळ घालण्याची चूक केली. एवढंच नाही तर पूजापाठ करून खन्ना कंपाऊंड परिसरातील ६० ते ७० नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार केल्यानंतर त्या रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आली.

मृत व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं त्याच्या नातलगांचे, अंत्यसंस्कारत सहभागी असणाऱ्यांचे स्वॅब कलेक्शन घेण्यात आले होते. त्यात प्रथम ९ नातलग पॉझिटिव्ह आले. मग टप्याटप्यानं आणखी २३ जण पॉझिटिव्ह आढळले. अजून काही संपर्कात आलेल्यांचे कोरोना चाचणी अहवाल बाकी आहेत. त्यामुळे आता पूर्ण खन्ना कंपाऊंड कंन्टेंमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

या परिसरात १० सफाई कर्मचारी जीव झोक्यात घालून काम करत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या सर्वांना पीपीई किट्स देण्यात आल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.



हेही वाचा

मिरा-भाईंदरमध्ये कंटेन्मेंट झोन वाढले, बघा तुमचा परिसर आहे का यांत?

मुंबईहून कुटुंबासोबत घरी गेला, पण दुसऱ्या दिवशी गंगेत सापडला मृतदेह

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा