रूग्णालय की कचरापेटी ?

 Govandi
रूग्णालय की कचरापेटी ?

गोवंडी - आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नेहमी केले जाते. पण पालिकेच्या रुग्णालयांना मात्र स्वच्छतेचा विसर पडल्याचे चित्र गोवंडीतील शताब्दी रुग्णालय परिसरात दिसत आहे. या रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणावर घाण पसरली असून, त्यामुळे विविध आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

शताब्दी रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत आहे. या रुग्णालयात चेंबूर, मानखुर्द, अणुशक्तीनगर, ट्रॉम्बे, शिवाजीनगर, देवनार आणि माहुल गाव या भागातून रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयाच्या इमारतीची डागडुजी सुरू असल्याने यासाठी लागणारे सामान इमारतीच्या बाजूलाच टाकलेले आहे. तसेच अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले असल्याने रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. त्यामुळे येथून अनेक साथीचे आजार फैलावण्याचा धोका वाढला आहे. रुग्णालयात देखील वेळेवर सफाई केली जात नसल्याचा आरोप काही रहिवाशांनी केला आहे.

Loading Comments