Advertisement

मार्चमध्ये होणार LPG गॅसच्या किंमती कमी

पुढच्या महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे

मार्चमध्ये होणार LPG गॅसच्या किंमती कमी
SHARES

पुढच्या महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हे संकेत दिले आहेत. एलपीजीच्या दरात सातत्यानं वाढ होत असलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले, "किंमती सतत वाढत आहेत हे योग्य नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे या महिन्यात किंमती वाढल्या आहेत. परंतु, पुढील महिन्यात त्याचे दर खाली येण्याची चिन्हं आहेत."

हिवाळ्यामध्ये एलपीजीचा वापर वाढला होता. त्यामुळे दबाव वाढला होता. या महिन्यात किंमती वाढल्या, तर पुढच्या महिन्यात किंमती कमी होतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.  

गेल्या आठवड्यात भाव वाढले

गेल्या आठवड्यात विना अनुदानित एलपीजी सिलिंडर (१४.२ किलो) ची किंमत १४९ रुपयांपर्यंत वाढली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, दिल्लीमध्ये १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ८५८ रुपये झाली आहे, जी आधी ७१४ रुपये होती. मुंबईत ही किंमत ७ हजार ७४७ रुपयांवरून वाढून ८९६ रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये ६८४.५० रुपयांवरून ८२९.५० आणि कोलकातामध्ये ते ७३४ रुपयांवरून वाढून ८८१ रुपये झाले आहेत.


ऑगस्टपासून किंमती वाढल्या

ऑगस्टमध्ये एलपीजी सिलिंडर सुमारे ६२ रुपयांनी स्वस्त झाला. यानंतर दरमहा किंमत उडी मारली. ऑगस्टपासून घरगुती गॅस सुमारे २९५ रुपयांनी महागला आहे. ऑगस्टमध्ये घरगुती गॅस सिलिंडर्सची किंमत दिल्लीत ५७४.५० रुपये, कोलकातामध्ये ६०१ रुपये, मुंबईत ५४६.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ५९०.५० रुपये होती. त्याचबरोबर आता त्यांचे दर ८५८ रुपये, ८९६ रुपये, ८२९.५० रुपये आणि ८८१ रुपये झाले आहेत.



हेही वाचा

१ एप्रिलपासून होणार BS-6 पेट्रोल-डिझेलची विक्री

एलपीजीच्या किंमतीत वाढ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा