एलपीजीच्या किंमतीत वाढ

लोकसभा निवडणुका संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही पैशांनी वाढ झाली होती. त्यापाठोपाठ आता स्वयंपाच्या गॅसमध्येही पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

SHARE

लोकसभा निवडणुका संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही पैशांनी वाढ झाली होती. त्यापाठोपाठ आता स्वयंपाच्या गॅसमध्येही पुन्हा वाढ करण्यात आली आहे. विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी, तर अनुदानीत सिलिंडची किंमत १ रुपये 23 पैशांनी वाढवण्यात आली आहे.  

इंडियन ऑईलने आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, या दरवाढीनंतर मुंबईत अनुदानीत एलपीजी सिलिंडरची किंमत ४९५ रुपये इतकी असेल. तर दिल्लीत अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत ४९७ रुपये ३७ पैसे असेल.

या आधी १ मे रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले दर आणि रुपयाची घसरलेली किंमत यामुळे एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे. हेही वाचा-

इडलीवाल्यानं चटणीसाठी वापरलं टॉयलेटचं पाणीसंबंधित विषय
ताज्या बातम्या