Advertisement

इडलीवाल्यानं चटणीसाठी वापरलं टॉयलेटचं पाणी

रेल्वे स्थानकातील अस्वच्छ पाण्याचं लिंबू सरबत आणि रेल्वेच्या स्टॉलमध्ये सापडलेला उंदीर या घटनांनतर आता एका इडलीवाल्यानं चक्क टॉयलेटमधील पाणी चटणी बनवण्यासाठी वापरल्याचं समोर आलं आहे.

इडलीवाल्यानं चटणीसाठी वापरलं टॉयलेटचं पाणी
SHARES

रेल्वे स्थानकातील अस्वच्छ पाण्याचं लिंबू सरबत आणि रेल्वेच्या स्टॉलमध्ये सापडलेला उंदीर या घटनांनतर आता एका इडलीवाल्यानं चक्क टॉयलेटमधील पाणी चटणी बनवण्यासाठी वापरल्याचं समोर आलं आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाबाहेरील इडली आणि मेदूवडा विकणाऱ्या इडलीवाल्यानं चटणीकरीता टाॅयलेटच्या पाण्याच वापर केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पुन्हा एकदा रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे


प्रवाशांच्या जीवाशी खेळ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा इडलीवाला हे पाणी टॉयलेटमधील नसल्याचं सांगत आहे. प्रत्यक्षात मात्र, या व्हिडिओमध्ये तो टॉयलेटमधलं पाणी कॅनमध्ये आणून भरताना आणि तेच पाणी वापरताना  स्पष्ट दिसत आहे. बोरिवलीतील अनेक प्रवासी सकाळी नाश्ता करण्यासाठी या इडलीवाल्याकडून इडली आणि मेदूवडा घेऊन खातात. असं असूनही हा इडलीवाला टॉयलेटचं पाणी वापरून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत आहे.


प्रकरणाची चौकशी

या सर्व प्रकाराची गंभीर दखल अन्न आणि औषध प्रशासनानं (एफडीआय) घेतली आहे. एफडीआय या प्रकाराची चौकशी करत आहे. तसंच, इडलीवाला चटणी तयार करण्यासाठी टॉयलेटमधलं पाणी वापरत असल्याचं समोर आल्याने या इडलीवाल्यावर काय कारवाई होणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

मनसे हा दुर्मिळ प्रजातीचा पक्ष, सुधीर मुनगंटीवार यांची खोचक टीकाRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा