Advertisement

अवकाळी पावसामुळे मच्छिमारांना मोठा फटका

मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणत बुधवारी अवकाळी पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळं मुंबईतील मच्छिमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर वळविल्या.

अवकाळी पावसामुळे मच्छिमारांना मोठा फटका
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणत बुधवारी अवकाळी पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळं मुंबईतील मच्छिमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर वळविल्या. त्याआधी मच्छिमारांनी पकडून आणलेली मासळी, जी सुकविण्याकरिता २ ते ३ दिवसांचा कालावधी लागतो.

बांबूवर वाळविण्यासाठी मासळी ठेवलेली होती. ती सर्व मासळी ओली होऊन खराब झाली आहे. मच्छीमारांचे यात हजारो रुपयांचं नुकसान झालं आहे.

प्रशासनानं प्रत्येक मच्छिमार गावांमध्ये जाऊन तिथे आपल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे करून मच्छिमारांचे झालेले नुकसान याचा अहवाल तयार करावा. तसंच, मच्छिमारांना त्यांच्या मासळीचे व इंधनाचे जे नुकसान झालेले आहे, त्याबद्दल नुकसान भरपाई मच्छीमार बांधवांना द्यावी, अशी विनंती भारतीय मच्छिमार काँग्रेसचे सरचिटणीस संतोष कोळी व मुंबई मच्छीमार काँग्रेसचे अध्यक्ष धनाजी कोळी यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांना केली आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा