शुक्रवारी डबेवाला पुतळ्याचे अनावरण

Mumbai
शुक्रवारी डबेवाला पुतळ्याचे अनावरण
शुक्रवारी डबेवाला पुतळ्याचे अनावरण
See all
मुंबई  -  

भायखळा - मुंबईचा डबेबाला ही मुंबईची खास ओळख आहे. याच डबेवाल्यांची ओळख सातासमुद्रापार देखील पोहोचली आहे. याचीच दखल घेत पालिकेने 2 महिन्यांपूर्वी 'काम करणारा डबेवाला' पुतळा हाजीअली जंक्शन येथे उभारला आहे. या पुतळ्याच्या अनावरणाला अखेर मुहुर्त मिळाला आहे. या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी 31 मार्चला होणार असल्याची माहिती डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली आहे. शुक्रवारी सकाळी 10.45 वाजता पालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्याहस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. यावेळी आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोयंका, शिल्पकार विलय शेंडे आणि डबेवाला संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे उपस्थित राहणार आहेत. आचारसंहितेमुळे या पुतळ्याचे अनावरण होऊ शकलं नव्हतं त्यामुळे आता तब्बल 2 महिन्यांनंतर पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.