Advertisement

सुशोभीकरणात पायवाट होणार गायब


SHARES

अंधेरी -  सहार गावच्या सुतार पाखाडी गावठाणातल्या गावकऱ्यांना आपापल्या घरी नेणारी ही पायवाट. 100 वर्षांहूनही अधिक जुनी. पण आता लवकरच ही पायवाट गायब होणार आहे. होय... गायब... विमानतळ सुशोभिकरण-विस्तारीकरणात ही पायवाट जाणार आहे. पायवाटेची ही जागा गावकऱ्यांच्या मालकीची, पण विमानतळ प्रकल्पाचं काम करणारी जीव्हीके कंपनी बेकायदेशीररित्या ही जागा बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यातूनच आता या पायवाटेवरून मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.
या जागेवर कामाची सुरूवात करू पाहणाऱ्या जीव्हीकेच्या कामगारांना गावकऱ्यांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारी हुसकावून लावलं. त्या दिवसापासून गावकरी पायवाटेवर पहाराच लावून बसले आहेत.

ही पायवाट ताब्यात घेण्यासाठी गावकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस देण्यात आली नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तर कोणत्याही नियमाच्या आधारे खासगी मालकीची जागा जीव्हीके घेतंय असा प्रश्नही केला जातो.
एमएमआरडीएने तर हे प्रकरण आपल्याला माहितच नसल्याचं म्हणत हात वर केलेत. असं असलं तरी गावकऱ्यांनी मात्र जीव गेला तरी पायवाटेची एक इंच जागाही जीव्हीकेच्या घशात जाऊ देणार नाही असा एल्गार केलाय. त्यामुळे जीव्हीके आणि गावकऱ्यांमधील संघर्ष यापुढे वाढणार हे मात्र नक्की.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा