Advertisement

काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या मुंबई-गांधीनगर वंदे भारत गाडीचा अपघात

मुंबई ते गांधीनगर दरम्यान धावणारी भारतातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत ट्रेनचा अपघात झाला.

काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या मुंबई-गांधीनगर वंदे भारत गाडीचा अपघात
SHARES

मुंबई ते गांधीनगर दरम्यान धावणारी भारतातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत ट्रेनचा अपघात झाला. सकाळी 11.15 वाजता हा अपघात झाला. ट्रेनसमोर म्हशींचा कळप आल्याचे सांगण्यात येत आहे. वटवा स्थानकातून मणिनगरकडे जाणाऱ्या गाडीने म्हशींच्या कळपाला टक्कर दिली.

अपघातानंतर म्हशींचे शव रुळांवरून काढून गाडी इच्छितस्थळी रवाना करण्यात आली. या अपघातात इंजिनच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे.

पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ पीआरओ जेके जयंती यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच या ट्रेनचे उद्घाटन केले. रेल्वेचे पीआरओ प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, या घटनेत फारसे नुकसान झाले नाही. रेल्वेच्या कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही. ट्रेन आपल्या नियोजित वेळेवर धावत आहे.

पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ पीआरओ म्हणाले की, हा अपघात गैरतपूर-वटवा स्थानकादरम्यान सकाळी झाला. मात्र, रेल्वे रुळाच्या आजूबाजूच्या ग्रामस्थांना त्यांची गुरे रुळाजवळ न सोडण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात येत आहे.

पीएम मोदींनी 30 सप्टेंबर रोजी उद्घाटन केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 सप्टेंबर रोजी गुजरात दौऱ्यात गांधीनगर ते मुंबई दरम्यानच्या हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांची पाहणी केली आणि उपलब्ध सुविधांचाही आढावा घेतला. ट्रेनच्या लोकोमोटिव्ह इंजिनच्या कंट्रोल सेंटरचीही त्यांनी पाहणी केली. वंदे भारत ट्रेन यशस्वी करण्यासाठी कष्ट करणाऱ्या कामगार, अभियंते आणि इतर कर्मचाऱ्यांशीही पंतप्रधान मोदींनी संवाद साधला.

वंदे भारतची आसन रचना

वंदे भारत ट्रेनमध्ये 1,123 जागा आहेत. यात एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये 104 जागा आणि चेअर कारमध्ये 1,019 जागा आहेत. एक्झिक्युटिव्ह चेअर कारमधील सर्व 104 आणि चेअर कारमधील 982 जागा बुक करण्यात आल्या होत्या. ही तिसरी वंदे भारत एक्सप्रेस असून या वर्गाची पहिली ट्रेन नवी दिल्ली-वाराणसी मार्गावर सुरू करण्यात आली. तर दुसरी नवी दिल्ली-श्री माता वैष्णोदेवी कटरा मार्गावर सुरू करण्यात आली.

प्रवासी भाडे किती आहे?

गांधीनगर ते मुंबई सेंट्रल चेअर कार तिकिटाचे भाडे रु. 1,275 आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार तिकिटाचे भाडे रु. 2,455 आहे. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर चेअर कारचे तिकीट 1,440 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे 2,650 रुपये असेल. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कॅटरिंग सेवेमुळे तिकिट दरात फरक आहे.हेही वाचा

परळ-सीएसएमटी दरम्यान तांत्रिक बिघाड, प्रवाशांना मनस्ताप

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा