वसई-विरार महानगरपालिकेला मौजे-अचोले (तहसील वसई, जिल्हा पालघर) येथे बहुविशेष रुग्णालय स्थापन करण्यासाठी जमीन संपादित करण्यास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
मौजे-अचोले येथील ही जमीन जिल्हा न्यायालय आणि निवासी क्षेत्रासाठी राखीव होती.
मौजे-अचोले येथील ही जमीन जिल्हा न्यायालय आणि निवासी क्षेत्रासाठी राखीव होती. त्यामुळे हे आरक्षण बदलून रुग्णालयासाठी जमीन हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
वसई-विरारची वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेऊन आमदार राजन बाळकृष्ण नाईक यांनी ही जमीन महानगरपालिकेला मोफत देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, ही जमीन अटी आणि शर्तींसह महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात आली आहे.
केवळ मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामासाठी जमीन वापरली जाणार
ही जमीन केवळ मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामासाठी वापरली जाईल. या जमिनीवर अतिक्रमण करू नये असे आदेशही महानगरपालिकेला देण्यात आले आहेत.
हेही वाचा