Advertisement

पोलिस व्हॅन आणि बेस्ट बसमध्ये धडक, नियंत्रण सुटल्याने अपघात

बेस्ट बस आणि पोलिस व्हॅनची धडक झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिस व्हॅन आणि बेस्ट बसमध्ये धडक, नियंत्रण सुटल्याने अपघात
SHARES

नवी मुंबईतील वाशी परिसरात बेस्ट बस आणि पोलिस व्हॅनची धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. समोरासमोर झालेल्या धडकेत पोलीस व्हॅनचा चालक आणि बस चालक जखमी झाला. दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

वाशीतील आरेंजा चौकात शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताचे व्हिज्युअल सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये दोन्ही वाहनांचा समोरासमोर धडक झाल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7.15 वाजता वाशी येथील अरेंजा सर्कल येथे सांताक्रूझ स्थानकातून येणाऱ्या बसला पोलिस व्हॅनने धडक दिली. टक्कर झाल्यानंतर काही वेळातच पोलिस व्हॅन एका कारला धडकली आणि नंतर ती दुसऱ्या बसला धडकली. पोलिस व्हॅनमधील चालक जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.



हेही वाचा

Mumbai Rains : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण माहिती">Mumbai Rains : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण माहिती

गुड न्यूज! नवी मुंबई विमानतळ 2024 मध्ये सुरू होईल : देवेंद्र फडणवीस

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा