Advertisement

पावसाने ओढ दिल्याने भाज्या महागल्या


पावसाने ओढ दिल्याने भाज्या महागल्या
SHARES

जून महिना संपत तरी पावसाला म्हणावी तशी सुरूवात न झाल्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरांनीही उसळी घेतली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याच्या दरात 10 ते 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर नेहमीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाले आहेत.

शेतकरी संपामुळे अगोदरच बाजारात भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यातच पावसाने ओढ दिल्याने भाज्यांचे नवीन पिक येण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाज्यांचे दर वाढले आहेत. येत्या 2 -3 दिवसांत पावसाने राज्यात हजेरी लावल्यास दर पुन्हा जागेवर येऊ शकतात, असे बाजार समितीतील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.



भायखळा मंडईत रोज सरासरी 160 ते 170 ट्रक भाजी येते. मात्र गुरुवारी भाज्यांचे 125 ट्रक आले. शिवाय मंडईत येणारी 40 टक्के भाजी चांगल्या प्रतीची नसल्याचे भाजी मंडईतील संघटनेचे पदाधिकारी किरण झोडगे यांनी सांगितले.

किरकोळ बाजारातील गुरूवारचे दर :

भाज्या
 दर ( प्रति किलाे)
फ्लॉवर
 60 रू
कोबी
 40 रू
टोमॅटो
 40 रू
वांगी
 80 रू
शिमला मिरची
 60 रू
भेंडी
 60 रू
कोथिंबीर जुडी
 50 रू
मेथी जुडी
 30 रू




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)








Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा