Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

Virar Hospital Fire : पतीच्या मृत्यूची बातमी ऐकताच पत्नीनं सोडले प्राण

धक्कादायक म्हणजे आगीत पतीचा मृत्यू झाल्याचं कळताच पत्तीनं देखील प्राण सोडले.

Virar Hospital Fire : पतीच्या मृत्यूची बातमी ऐकताच पत्नीनं सोडले प्राण
SHARES

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. पण आणखी एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. रुग्णालयातील आगीत पतीचा मृत्यू झाल्याचं कळताच पत्तीनं देखील प्राण सोडले. 

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात पहाटे आग लागली होती. या आगीत ICU मध्ये उपचार घेत असलेल्या १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात ४५ वर्षीय कुमार दोषी यांचाही दुर्देवी मृत्यू झाला. ते वसईतील १०० फूट रोड परिसरात राहत होते.

कुमार दोषी यांच्या पत्नी चांदणी दोषी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर विरारच्या जीवदानी रुग्णालयात उपचार सुरू होते. चांदणी यांना पतीच्या निधनाची बातमी दिल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचं निधन झालं.

मुंबईजवळच्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh COVID care Hospital) अतिदक्षता विभागात शुक्रवारी भीषण आग लागली होती. या आगीत होरपळून १४ जणांचा जीव गेला. तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतीदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं. तसंच उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसंच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत.

आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले. त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे.

याशिवाय मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ लाखांची तर जखमींना १ लाखांची मदत जाहीर केली आहे. वसई-विरार महापालिकेकडून देखील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाखाची तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.हेही वाचा

रुग्णाला अ‍ॅडमिट करण्यासाठी घेतले दीड लाख, ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयातील प्रकार

विरार हॉस्पिटमधील दुर्घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा