Advertisement

रुग्णाला अ‍ॅडमिट करण्यासाठी घेतले दीड लाख, ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयातील प्रकार

ग्लोबल कोरोना रुग्णालयामध्ये एका तरुणाच्या वडिलांना अतिदक्षता विभागातील खाट मिळावी यासाठी त्याच्याकडून दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला.

रुग्णाला अ‍ॅडमिट करण्यासाठी घेतले दीड लाख, ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयातील प्रकार
SHARES

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोरोना रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, रुग्णालयाने दीड लाखाची रक्कम घेऊन एका रुग्णाला अ‍ॅडमिट करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनसेने गुरुवारी हा प्रकार उघडकीस आणला. तर  महापौर नरेश म्हस्के यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

ग्लोबल कोरोना रुग्णालयामध्ये एका तरुणाच्या वडिलांना अतिदक्षता विभागातील खाट मिळावी यासाठी त्याच्याकडून दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. त्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे.  या प्रकरणी जाधव यांनी ठाणे पोलिसांकडंही तक्रारही दाखल केली आहे.

गुरूवारी रात्री बारा- साडेबाराच्या सुमारास मनसेचे अविनाश जाधव यांना बेड उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र  पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास वसईतील एका रूग्णास दीड लाख रूपये घेऊन दाखल करण्यात आलं. 

वसईतील ह्या रूग्णाची परिस्थिती गंभीर होती.  त्याला सेव्हन हिल रूग्णालयातून या रूग्णालयात दाखल करून घेण्यात आलं. पहिले पैसे दिल्यानंतरच रूग्णाला दाखल करून घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. या पैशामध्ये सर्वांचा हिस्सा असून पैसे मंत्र्यांपर्यंत जातात असं त्यांना सांगण्यात आलं. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. हे रेकॉर्डींग अविनाश जाधव यांनी पोलीस आयुक्तांकडे पाठवले असून चौकशीची मागणी केली आहे.

दरम्यान,  ही अत्यंत गंभीर व क्लेशदायी बाब आहे, असं ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.  त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.रुग्णाच्या नातेवाईकांकडे याबाबतचे ठोस पुरावे असतील तर त्यांनी ते तातडीने महापालिकेस सादर करावेत, असंही आवाहन त्यांनी केलं आहे.



हेही वाचा 

  1. विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील ICU विभागात आग, १३ जणांचा मृत्यू

  1. 'ऑक्सिजन' एक्स्प्रेस महाराष्ट्राकडे रवाना

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा