कॉलेज प्रवेशासोबतच होईल मतदार नोंदणी

  Mumbai
  कॉलेज प्रवेशासोबतच होईल मतदार नोंदणी
  मुंबई  -  

  वय वर्षे18 पूर्ण केल्यानंतरही अनेकजण मतदार यादीत नाव नोंदवण्याचे टाळतात. साधारणत: काॅलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच 18 पूर्ण केल्यावर विद्यार्थी मतदानासाठी पात्र ठरतात. मात्र मतदार यादीत नाव नसल्याने त्यांना आपला अधिकार बजावता येत नाही. अनेकदा ते या बाबतीत फारसे सजगही नसतात. तरूण पिढीच्या हाती देशाचे भवितव्य असल्याने अशा तरूणांना मतदानासाठी प्रोत्साहीत करण्याचे निवडणूक आयोगाने आता ठरवले आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने एक मोहीम हाती घेतली असून या मोहिमेंतर्गत कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून मतदार नोंदणीचा अर्ज भरून घेण्यात येणार आहे. 

  मुंबईतल्या विविध कॉलेजांमध्ये शिकणारे हजारो विद्यार्थी दरवर्षी वयाची 18 वर्षे पूर्ण करतात, अशा सर्व विद्यार्थ्यांना या मोहिमेद्वारे मतदान प्रक्रियेत सामावून घेता येणार आहे.

  तरुण मतदारांची संख्या वाढावी, तसेच तरुणांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी निवडणूक आयोग ही मोहीम राबवत आहे. ही मोहीम राज्यभर राबवण्यात येणार आहे. कॉलेज प्रवेशासोबतच मतदार नोंदणीचा 6 नंबरचा अर्ज विद्यार्थ्यांना दिल्यामुळे, मतदान नोंदणी करणे सोपे होईल. 

  - अनिल वाळवी, माहिती निवडणूक अधिकारी

  त्याचबरोबर प्रत्येक गृहनिर्माण संस्थेमध्ये जाऊन नाव नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. कार्यालय, पोस्ट, अशा ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणार असल्याची माहितीही वाळवी यांनी यावेळी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.