Advertisement

2019च्या निवडणुकीपासून मतनोंदणीची पावती मिळणार


2019च्या निवडणुकीपासून मतनोंदणीची पावती मिळणार
SHARES

मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोग 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकांपासून इव्हीएम मशिनमध्ये मतनोंदणी रिसिटचा वापर करणार आहे. या प्रक्रियेसाठी अंदाजे 5 हजार 412 कोटी रूपयांचा निधी अपेक्षित आहे. डिसेंबर 2016 मध्ये केंद्र सरकारने 1 हजार ९ कोटी रूपये मंजूर केले आहेत, अशी माहिती किरीट सोमय्यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या इसीआयएल आणि बीईएल या कंपन्यांना याचे कंत्राट देण्यात आले आहे. 2008 आणि 2010 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत बऱ्याच ट्रायल घेतल्या होत्या. सर्व पक्षांना याबाबत विश्वासात घेऊन मतनोंदणी रिसिटचा वापर करण्यावर सहमतीही घेतली होती.

राज्यात झालेल्या नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने नेत्रदीपक कामगिरी केली. राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने आणि विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला. त्यानंतर देशातल्या 5 राज्यात निवडणुका झाल्या. त्यातही भाजपाने जोरदार कामगिरी केली. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे प्रथमच 324 इतके आमदार निवडून आले. निकालानंतर बसपाच्या मायावतींनी ईव्हीएम मशीनबद्दल हरकत घेत या निकालावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. निवडणूक आयोगाने मात्र या सर्व आरोपांचा इन्कार केला. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे मतदान झाल्यावर त्याची पावती मतदारांना द्यावी अशी मागणी केली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा