दिग्गज झाले प्रभाग'हीन'

  Pali Hill
   दिग्गज झाले प्रभाग'हीन'
  मुंबई  -  

  मुंबई – मुंबई महानगपालिकेच्या प्रभागांची पुर्नरचना आणि सोडत पालिकेतील अनेक नेत्यांना प्रभाग'हीन' करून गेली. पुर्नरचना आणि प्रभागांची सोडत याची धाकधूक सर्व पक्षातील नगरसेवकांनी होती. त्यानुसार आज वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या प्रभाग रचनेच्या सोडतीत भाजप, शिवसेना, मनसे, काग्रेस अशा सर्वच पक्षातील अनेक दिग्गजांच्या हातातून त्यांचे प्रभाग निसटले. त्याचा फटका दिग्गजांसह त्यांच्या पक्षालाही बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काँग्रेसचे गटनेते प्रवीण छेडा, पालिकेत चमकदार कामगिरी दाखवत विरोधी पक्षाची भूमिका चोखपणे बजावणारे मनसे गटनेते संदीप देशपांडे, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, मनसेचे संतोष धुरी, काॅंग्रेसचे देवेंद्र आंबेरकर, काग्रेस नगरसेविका शितल म्हात्रे, डॉ. राम बरोट, गीता यादव, अभिषेक घोसाळकर, प्रवीण शहा, जितेंद्र दळवी अशा अनेक दिग्गजांना प्रभाग पुर्नरचनेचा फटका बसला आहे.

  संदीप देशपांडे हे 2012 च्य निवडणुकीत दादरमधील 185 प्रभागातून मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पण यावेळी मात्र आता त्यांना या प्रभागातून निवडणूक लढता येणार नाही. कारण हा प्रभाग महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे आता देशपांडे निवडणूक लढवणार की नाहीत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मनसेसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
  स्थायी समिती सदस्य यशोधर फसणे यांच्या प्रभागाचेही चार तुकडे झाले असून, त्या प्रभागातील मोठा भाग अऩुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव झाला आहे. शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांनाही प्रभाग रचनेच्या बदलाचा मोठा झटका बसला आहे. त्यांचा प्रभाग क्रमांक 1 खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाला आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांच्या प्रभागाचेही तीन तुकडे झाले आहेत. त्यांचा प्रभाग 195, 198 आणि 199 अशा नव्या प्रभागांमध्ये बदलला आहे. त्यांना आता 195 किंवा 198 प्रभागातून लढावे लागणार असून, त्यासाठी त्यांना नव्याने बांधणी करावी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.
  प्रतीक्षानगरमधील शिवसेनेच्या नगरसेविका प्रणिता वाघधरे यांचा प्रभाग अऩुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. तर शिवसेनेच्याच संजना मुणगेकर यांचा प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. मनसेच्या संतोष धुरी यांच्या प्रभागाचेही तुकडे झाले असून आता त्यांनाही आता नवा पर्याय शोधावा लागणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.