गेला वॉर्ड कुणीकडे ?

  Pali Hill
  गेला वॉर्ड कुणीकडे ?
  गेला वॉर्ड कुणीकडे ?
  गेला वॉर्ड कुणीकडे ?
  See all
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महानरपालिकेच्या निवडणुकीसाठीचे नवे प्रभाग आरक्षण पालिकेतील प्रस्थापित नेत्यांना धक्का देणारे ठरले आहे. सोमवारी जाहीर झालेल्या पालिका प्रभाग आरक्षण सोडतीत जवळपास 80 नगरसेवकांचे प्रभाग बदलले आहेत.

  मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यासाठी प्रभाग पुर्नरचना आणि आरक्षण सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली. यात मुंबई शहरातील 7 प्रभाग कमी झाले असून, उपनगरातील प्रभागांची संख्या 7 ने वाढली आहे. प्रभाग पुर्नरचनेचा फटका सर्वच राजकीच पक्षातील दिग्गजांना बसला आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रवीण छेडा, देवेंद्र आंबेरकर, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे, मनसेचे संतोष धुरी, उपमहापौर अलका केरकर, भाजपच्या रितू तावडे यांचा समावेश आहे.
  तसेच या सोडतीत मुंबईतील 17 प्रभाग अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. गेल्या निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी 11 आणि अनुसूचित जमातीसाठी दोन असे एकूण 13 प्रभाग राखीव ठेवण्यात आले होते. यावेळी आरक्षित प्रभागांची संख्या वाढून 17 एवढी झाली आहे.
  अनुसूचित जातींसाठी राखीव प्रभाग - 26, 53, 93, 121, 142, 146, 152, 155, 169, 173, 195, 198, 200, 210, 255.
  अनुसूचित जमातींसाठी राखीव प्रभाग - 59 आणि 99
  अनुसूचित जाती (महिला) राखीव प्रभाग - 53, 121, 142, 200, 210 आणि 225
  अनुसूचित जमाती (महिला) राखीव प्रभाग - 59

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.