राणीबागेत लवकरच पेंग्विन दर्शन?


SHARE

भायखळा - वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात जुलैमध्ये दक्षिण कोरियाच्या सेऊल येथील आठ पेंग्विन आणण्यात आले होते. त्यातल्या एक पेंग्विनचा मृत्यू झाला आहे. परंतु उरलेले सात पेंग्विन पाहण्याकरता कधी ठेवण्यात येणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. आता येत्या 15 ते 20 दिवसांत पेंग्विन नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होतील अशी माहिती संजय त्रिपाठी यांनी ‘मुंबई लाइव्ह’ शी बोलताना दिली. यापूर्वी मुंबईकरांना 15 नोव्हेंबरला पेंग्विन पाहण्यासाठी उपलब्ध होतील अशी माहिती प्राणीसंग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी दिली होती. मात्र मुंबईकरांना पेंग्विन पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. पण या वेळी तरी त्रिपाठी यांच्या सांगण्यानुसार पेंग्विन नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होतील का?, की पुन्हा नागरिकांना पेंग्विन पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. हे येत्या 15 ते 20 दिवसांत कळेलच.

संबंधित विषय
ताज्या बातम्या