पालिका तोडणार चेंबूरमधील ५८ इमारतींचे पाणी कनेक्शन

 Chembur
पालिका तोडणार चेंबूरमधील ५८ इमारतींचे पाणी कनेक्शन
Chembur, Mumbai  -  

चेंबूर - विकासकाने पाण्याची साडेतीन कोटींची थकबाकी पालिकेकडे जमा न केल्याने याचा फटका सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या दोन हजार कुटुंबियांना बसणार आहे. 

याठिकाणी असलेल्या जुन्या इमरातींच्या पुनर्विकासकाचे काम एका खासगी विकासकाने हाती घेतले होते. त्यानुसार करारामध्ये त्याने पाण्याचे बील भरण्याचे अश्वासन रहिवाशांना दिले होते. मात्र कित्येक वर्ष पाणी बील न भरल्याने पाण्याचे बील साडे तीन कोटींच्या घरात गेले आहे. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून पालिकेने यासर्व इमारतींना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. येत्या चार ते पाच दिवसात ही रक्कम जमा करण्याचे नोटीसमध्ये सांगितले आहे. तसेच ही रक्कम जमा न केल्यास पाणी कनेक्शन बंद करण्याचा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आलाय. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी पालिका अधिकाऱ्यांना भेटून काही दिवसांची मुदत मागितली आहे. तर या सर्व प्रकाराचा नगरसेविका आशाताई मराठे यांनी विरोध केला आहे.

"पालिकेने ही रक्कम विकासकाडून वसूल करावी. पालिकेने रहिवाशांवर कारवाई केल्यास आम्ही पालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडू."

-आशाताई मराठे, नगरसेविका


"मी २൦൦३ पासून रहिवाशांना या विकासकापासून सावध राहण्याचे सांगत होतो. मात्र अनेकांनी लोभापायी माझे काहीही ऐकले नाही. त्यामुळे ही रहिवाशांची देखील चूक आहे. शिवाय पालिकेने अशा विकासकांवर कडक कारवाई करावी."

-सुदिन प्रधान, सामाजिक कार्यकर्ते

Loading Comments