Advertisement

दादर, घाटकोपर, भांडूप, मुलुंड परिसरात 24-25 मे रोजी पाणी पुरवठा बंद

मुंबईकरांवर पाणी संकट!

दादर, घाटकोपर, भांडूप, मुलुंड परिसरात 24-25 मे रोजी पाणी पुरवठा बंद
SHARES

मुंबईतील घाटकोपर, भांडूप आणि मुलूंड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना 24-25 मे रोजी पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव-मुलूंड लिंक रोड प्रोजेक्टच्या अंतर्गत फोर्टिस रुग्णालय ते मुलूंड औद्योगिक क्षेत्रातलगत असलेल्या 1200 मिमी व्यास पाईपलाईनला वळवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे दादर, घाटकोपर, भांडुप-मुलुंडमध्ये आज पाणी बंद असेल. 24-25 मे रोजी 24 तास या परिसरात पाणी बंद असणार आहे. 

या परिसरात पाणी पुरवठा बंद? 

एन विभाग - विक्रोळी गाव (पूर्व), गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज रुग्णालयाच्या परिसरात मध्यरात्रीनंतर 3.30 ते सकाळी 11.30 यावेळेत परिसरात पाणी बंद असेल. 25 मे रोजी संपूर्ण दिवसरभर पाणीपुरवठा बंद राहील.

एस विभाग - नाहूर (पूर्व), भांडुप (पूर्व), कांजूर (पूर्व) चा परिसर, टागोरनगर संपूर्ण परिसर, कन्नमवार नगर विक्रोळी (पूर्व), मुलुंड-गोरेगाव जोडरस्तालगतचा परिसर, सीएट टायर मार्गलगतचा परिसर, गाव रोड, दत्त मंदिर मार्ग, अंजना इस्टेट, शास्त्री नगर, उषा नगर, लाल बहादूर शास्त्री मार्गलगतचा परिसर, सोनापूर, गावदेवी मार्ग, जंगल मंगल मार्ग, लेक मार्ग, द्राक्ष बाग, काजू टेकडी, जनता मार्केट, टँक रोड परिसर, महाराष्ट्र नगर, कोकण नगर, सह्याद्री नगर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्गलगतचा परिसर येथे पाणीपुरवठा 24-25 मे रोजी बंद असेल. 

टी विभाग- मुलुंड-गोरेगाव जोडरस्तालगतचा परिसर, लाल बहादूर शास्त्री मार्गलगतचा परिसर, जे. एन. मार्ग, देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी मार्ग, डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, एम. जी. मार्ग, एन. एस. मार्ग नाहुर गाव आदी ठिकाणी 24 तास पाणी बंद असेल.

शुक्रवारी जी दक्षिण विभागातील बीबीडी चाळ, डिलाईल रोड, करी रोड आणि लोअर परळ परिसरात 4.30 ते 7.30 या सकाळच्या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील. 



हेही वाचा

Dombivli MIDC Blast: कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पुणे पाठोपाठ मुंबईत अल्पवयीन मुलाकडून अपघात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा