Dombivli MIDC Blast: कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

डोंबिवली MIDC ब्लास्ट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली.

Dombivli MIDC Blast: कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
SHARES

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील कंपनीत झालेल्या स्फोटात मोठी अपडेट समोर येत आहेत. डोंबिवली एमआयडीसी अमूदान कंपनी रिअॅक्टर ब्लास्ट प्रकरणी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालती प्रदीप मेहता (Malati Pradeep Mehta) आणि मलय प्रदीप मेहता (Malay Pradeep Mehta) यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

डोंबिवली एमआयडीसी फेस टूमधील अनुदान या कंपनीत (Dombivli MIDC Blast) काल (२३ मे) रिअॅक्टर ब्लास्ट झाला होतै. हा ब्लास्ट अतिशय भीषण होता. कंपनीचा आजूबाजूच्या चार ते पाच कंपन्यांना देखील या स्फोटाची झळ बसली आहे. या परिसरातील इमारतीच्या काचांना देखील तडे गेल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

या दुर्घटनेत ६४ जण जखमी झाले आहेत, तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्याप देखील काहीजण कंपनीमध्ये अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कालपासून बेपत्ता असलेल्या कामगारांचे नातेवाईक या कंपनीच्या बाहेर त्यांची वाट पाहत (Dombivli MIDC Blast Latest Update) आहेत.

यंत्रणांकडून त्यांच्याबाबत काही माहिती मिळते का? याकडे डोळे लावून बसले आहेत. जखमींचा खर्च शासन करेल, तर मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची मदत दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

डोंबिवलीतील स्फोट झालेल्या कंपनीमध्ये बॉयलरला परवानगी देण्यात आली नव्हती, अशी धक्कादायक माहिती कामगार विभागाने दिलीय. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

कंपनीमध्ये रिॲक्टरचा स्फोट (Dombivli MIDC Blast Update) झालाय. या स्फोटाची झळ बाजूच्या सहा कंपन्यांना देखील बसली आहे. या कंपन्यांमध्ये अजूनही काही कामगार अडकून पडल्याची माहिती मिळत आहे. त्यांना वाचविण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.



हेही वाचा

पुणे पाठोपाठ मुंबईत अल्पवयीन मुलाकडून अपघात

6 वर्षांच्या मुलाला खासगी व्हिडिओ शूट करण्यास सांगितल्याप्रकरणी आईवर गुन्हा दाखल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा