पाणीकपातीसाठी तयार रहा!

 Mumbai
पाणीकपातीसाठी तयार रहा!

मुंबई - पालिकेच्या वतीने गुंदवली-कापूरबावडी-भांडुप या जलबोगद्यात कापूरबाडी आणि भांडुप संकुल येथे झडपा बसवण्याचे काम करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे येत्या शनिवारी 25 मार्चपासून ते 8 एप्रिलपर्यंतच्या कालावधीत शहरातील वॉर्ड ए, सी, डी, जी/दक्षिण, जी/उत्तर या परिसरात 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

तसेच सर्व पश्चिम उपनगरातील म्हणजे वांद्रे ते दहिसर आणि पूर्व उपनगरातील एल, एन आणि एस या वॉर्डात देखील 10 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. 25 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. तर नागरिकांनी पाणी कपातीच्या कालावधीत पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Loading Comments