Advertisement

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिन्यांना 'या' भागात धोका


मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिन्यांना 'या' भागात धोका
SHARES

मुंबईला ७ तलावांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. यातील मुंबईसाठी पालघरहून येणाऱ्या मोठमोठ्या जलवाहिन्या फोडून त्यातून पाण्याची चोरी केली जात असल्याची येत आहे. मुंबईतल्या वांंद्रे-माहीम भागात ही चोरी सर्वाधिक होत.

काही ठिकाणी वाहिन्यांना छिद्र पाडून तर काही ठिकाणी व्हॉल्व्हजवळील गळतीचा फायदा घेत ही चोरी केली जात आहे. मुंबई शहर व उपनगरला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून पाण्याचा पुरवठा होतो. हे पाणी ३ ते ४ फूट व्यासाच्या लोखंडी वाहिन्यांनी शहर व उपनगरात आणले जाते.

या वाहिन्यांमधून पाणी चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. वांद्रे ते माहीम दरम्यान अनेक ठिकाणी या जलवाहिन्या खारफुटी जंगलातून जातात. अनेक भागात त्या उघड्यावर आहेत. यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होताना दिसते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या जलवाहिन्या दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरण्याचा धोका आहे. याबाबत पोलिसांकडून आधीच प्रशासनाला सावध करण्यात आले आहे. त्यामुळे या वाहिन्यांभोवती संरक्षक भिंत उभारण्याचा प्रकल्प महापालिकेच्या विचाराधीन आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा