प्रतिक्षानगरमध्ये 'पाणी'बाणी

 Pratiksha Nagar
प्रतिक्षानगरमध्ये 'पाणी'बाणी
प्रतिक्षानगरमध्ये 'पाणी'बाणी
See all

सायन, प्रतिक्षानगरमध्ये सध्या 'पाणीबाणी'ची परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील 15 आणि 12 क्रमांकाच्या इमारतीमध्ये होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे रहिवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. 

विशेष म्हणजे अपुरा पाणी पुरवठा आहेच त्याचसोबत येणारे पाणी हे अशुद्ध असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या 20 दिवसांपासून रहिवासी या समस्येला तोंड देत आहेत. या रहिवाशांनी आपली व्यथा स्थानिक नगरसेवकांकडेही मांडली. 

यावर तोडगा काढण्यासाठी जाग आलेल्या नगरसेवकांनी आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, म्हाडा अभियंत्यांनी या विभागात पाहणी केली. दरम्यान, नागरिकांनी यावेळी या सगळ्यांसमोर समस्येचा पाढाच वाचला. अखेर 4 दिवसांची मुदत देत पाण्याचा आणि अस्वच्छतेचा प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन नगरसेवक आणि पालिका कर्मचाऱ्यांनी दिले. तसेच जितकं शक्य होईल तेवढं काम आम्ही 4 दिवसांत करू असं म्हाडा दुय्यम अभियंता हरिष कचवाल यांनी सांगितले.

Loading Comments