Advertisement

पोर्तुगीज चर्च समोरील जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया


पोर्तुगीज चर्च समोरील जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया
SHARES

महापालिकेच्या जी उत्तर विभागातील पोर्तुगीच चर्च समोरील परिसरातील जलवाहिनी फुटली आहे. जलवाहिनी फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया गेलं आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम महापालिकेच्या सहाय्यक अभियंता जलकामं (तातडीचा दुरुस्ती विभाग-वरळी) या विभागानं तांतडीनं हाती घेतलं आहे. 

सद्यस्थितीत पाण्याची गळती थांबविण्यात आली आहे. दरम्यान, जलवाहिनी फुटली असली तरी परिसरातील पाणी पुरवठा खंडित होणार नसल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक अभियंता जल काम विभागाचे अधिकारी जीवन पाटील यांनी दिली.

जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील पाणीपुरवठा बंद न करता दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे.

जलवाहिनी फुटण्यापूर्वी येथील रस्ता खचला होता. जलवाहिनी वरील झाकण दबलं गेलं होतं. त्यामुळं या रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळं येथील राहिवाशांनी महापालिकेच्या जी उत्तर विभागाला रस्ता खचल्याचं ट्विटरच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिलं. मात्र तरीही दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा