Advertisement

जी दक्षिण विभागात फुटली जलवाहिनी; दुरुस्तीच्या कामात कर्मचाऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना

जलवाहिनी फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, हजारो लिटर पाणी वाया जात गेलं आहे.

जी दक्षिण विभागात फुटली जलवाहिनी; दुरुस्तीच्या कामात कर्मचाऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना
SHARES

महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील दीपक सिनेमगृहा समोरील परिसरात मुख्य जलवाहिनी फुटली आहे. जलवाहिनी फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, हजारो लिटर पाणी वाया जात गेलं आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम महापालिकेच्या सहाय्यक अभियंता जलकामं (तातडीचा दुरुस्ती विभाग-वरळी) या विभागानं तांतडीनं हाती घेतलं आहे. मात्र या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामात पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक अभियंता जल काम विभागाचे अधिकारी जीवन पाटील यांनी दिली.

जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील पाणीपुरवठा बंद न करता दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे. जलवाहिनी फुटून पाण्याची गळती होत असल्यानं रस्ता खचला आहे. त्यामुळं गळती शोधक पथकानं खोदकामाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत १५ ते १७ फूट खोल खोदकाम झाल्याची माहिती जीवन पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम करताना कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून काम करावं लागत आहे.

जी दक्षिण विभागातील पाणीपुरवठा खंडित न करता खोदकाम केलं जातं आहे. अद्याप गळतीचं ठिकाण हाती लागलं नसून, गळती शोधण्याचं काम अहोरात्र सुरू आहे. मुख्य जलवाहिन्या या २० ते २५ फूट खोल असल्यामुळं खोदकाम करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. खचलेल्या रस्त्यात मुख्य गटार, पर्जन्य जल मुख्यवाहिनी आणि टाटा कंपनीच्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या असून त्यांच्याखालून गळती असलेली जलवाहिनी जात असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या अडथळ्यामुळं दुरुस्तीचं काम हे अत्यंत गुंतागुंतीचे आहे. तरी तातडीचा दुरुस्ती विभाग-वरळी या विभागानं जल अभियंता व उपायुक्त (वि.अभियांत्रिकी) अजय राठोर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक अभियंता जीवन पाटील, वैभव गावडे कनिष्ठ अभियंता यांच्या नेतृत्वाखाली गळती शोधण्याचं युद्धपातळीवर काम सुरू आहे. 

दुरुस्तीचं काम करताना जलवाहिनीवर असलेलं मुख्य गटार, पर्जन्य जलवाहिनी यांना नुकसान न पोहचवता काम चालू आहे. शिवाय लोअर परेलच्या उड्डाणपुलाचं काम चालू असून, त्याला व वाहतुकीस कोणताही अडथळा येवू न देता गळतीचं पाणी रस्त्यावर येवू न देता सर्व प्रकारे सुरक्षिततेची काळजी घेऊन जलवाहिनी व गळती शोधण्याचे काम चालू आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा