Advertisement

अंधेरीतील लिंक रोडवर जलवाहिनीच्या दुरूस्तीमुळं वाहतुककोंडी

जलवाहिनी फुटल्यानं जलवाहिनी आणि रस्त्याची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे.

अंधेरीतील लिंक रोडवर जलवाहिनीच्या दुरूस्तीमुळं वाहतुककोंडी
(Representational Image)
SHARES

अंधेरीतील सिटी मॉलजवळील लिंक रोडवर मंगळवारी जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया गेलं. सध्या फटलेल्या जलवाहिनीची दुरूस्तीचे काम सुरू आहे. मात्र दुरूस्तीच्या कामामळं अंधेरी लिंक रोडवरील दोन्ही मार्गांवर मोठी वाहतुककोंडी झाल्याची माहिती समोर येत आहे.

जलवाहिनी फुटल्यानं जलवाहिनी आणि रस्त्याची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे.

अंधेरीतील वीरा देसाई रोडला पाणी पुरवठा करणारी पाण्याची पाईपलाईन फुटली. त्यानंतर महापालिकेच्या अधिकारी व कामगारांनी तातडीनं जलवाहीच्या दुरूस्तीचं काम हाती घेतलं. यावेळी ४५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती करत असतानाच पुढे आणखी एक गळती असल्याचं आढळलं. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या दोन्ही गळती तातडीनं थाबवल्या व जलवाहिनीची दुरूस्ती केली. तसंच, वीरा देसाई रोडवरील पाणीपुरवठा नियमित सुरू करण्यात आला आहे.

परंतू, दुरूस्तीच्या कामासाठी रस्ता खणण्यात आल्यानं रस्ता दुरूस्तीचं काम अद्याप बाकी आहे. सध्या रस्त्याच्या दुरूस्तीचं काम सुरू आहे. परिणामी या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतुककोंडीचा सामना करावा लागत आहे. नागरी रस्ते विभागाकडून हा रस्ता दुरुस्त केला जात आहे. दुरूस्तीचे काम पुढील एक ते दोन दिवसांत पूर्ण होऊन, नवीन लिंक रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा