वरळीत पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी वाया

 BDD Chawl
वरळीत पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी वाया
वरळीत पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी वाया
वरळीत पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी वाया
See all

वरळी - पाइपलाइन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेल्याने वरळी सीफेसजवळील परिसर जलमय झाला. मंगळवारी संध्याकाळी सात वाजता व्होडाफोन कंपनीचे काम सुरू असताना पाइपलाइनला तडा गेला. त्यानंतर कामगार पळून गेले.

दरम्यान, पाइपलाइनचे काम पालिकेच्या जल विभागाने सुरू केले. तोपर्यंत हजारो लीटर पाणी वाया गेले होते. शिवाय परिसरातील पाणी अजूनही काढले गेले नाही. ही पाइपलाइन फुटल्याने या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती स्थानिक नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी दिली.

Loading Comments