Advertisement

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत ७७ टक्के पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ ही तलावांत मिळून सध्या ११ लाख १९ हजार ८१५ दशलक्ष लिटर म्हणजेच ७७.३७ टक्के पाणीसाठा आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत ७७ टक्के पाणीसाठा
SHARES

मुंबईत गेल्या काही दिवसांपुर्वी मुसळधार पावसानं हजेरी लावत मुंबईकरांना मोठा दिलासा दिला. यावेळी मुसळधार पावसानं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही तुफान हजेरी लावली. त्यामुळं मुंबईचं पाणीसंकट दुर झालं आहे. दरम्यान काही दिवसांपासून पावसानं मुंबईत विश्रांती घेतली आहे. मात्र, असं असलं तरी ७ ही तलावांत मिळून सध्या ११ लाख १९ हजार ८१५  दशलक्ष लिटर म्हणजेच ७७.३७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा दुपटीहून जास्त आहे. मुंबईकरांची पाण्याची चिंता कमी झाली असली तरी अद्याप तलावांतील साठ्यात २२ टक्के तूट आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात १७ जुलैपर्यंत अगदीच कमी पाऊस पडला होता. त्यामुळं पाणीकपात करावी लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर पडलेल्या पावसामुळं तलावांतील जलसाठ्यात भरघोस वाढ झाली. गेल्या वर्षीपेक्षा चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून तलाव क्षेत्रातही अगदी मोजकाच पाऊस पडत आहे. तरीही मातीतून झिरपत येणाऱ्या पाण्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होते आहे.

येत्या २ महिन्यांत २२ टक्के तूट भरून निघेल इतका पाऊस पडण्याची गरज आहे. गेल्या वर्षी २०२० मध्ये जुलैमध्ये पाणीसाठा वाढत नसल्यामुळं अखेर ऑगस्टमध्ये २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र, ऑगस्टमध्ये चांगला पाऊस पडल्यानंतर २१ ऑगस्टला पाणीकपात १० टक्के करण्यात आली. तर २०१८ मध्ये पाणीसाठ्यात ९ टक्के तूट राहिल्यामुळं वर्षभर १० टक्के कपात करण्यात आली होती.

मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करावा लागतो. सातही तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असतात तेव्हा एकूण पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर असतो. तलाव काठोकाठ भरलेले असतात तेव्हाच मुंबईला पूर्ण पाणीपुरवठा होऊ शकतो. तलावातील एकू ण पाणीसाठा हा ३१ जुलैपर्यंत पुरेल या दृष्टीने त्याचे पालिके च्या जल अभियंता खात्याद्वारे नियोजन केले जाते.



हेही वाचा -

राज्यात ६ हजार नवीन कोरोना रुग्णांचं निदान

Unlock Guideline In Mumbai : मुंबईत काय सुरू? काय बंद? वाचा सविस्तर


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा