Advertisement

पनवेल पालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

आगामी काळात पाणीटंचाई भासू नये यासाठी पनवेल महापालिकेने आतापासूनच नियोजन सुरू केलं आहे.

पनवेल पालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद
SHARES

आगामी काळात पाणीटंचाई भासू नये यासाठी पनवेल महापालिकेने आतापासूनच नियोजन सुरू केलं आहे. यानुसार आता पनवेल महापालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे पनवेल पालिका क्षेत्रात ६ हजार ३०० पाणी ग्राहकांना पाण्याची काटकसर करावी लागणार आहे.

पनवेल पालिका क्षेत्राला देहरंग धरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) पाणीपुरवठा करण्यात येतो. देहरंग धरण हे पालिकेच्या मालकीचं आहे.  एमआयडीसी आणि एमजेपीकडून रविवारी व सोमवारी पाणीपुरवठा कमी होत असतो. त्यामुळे पालिकेला देहरंग धरणातील पाण्याचा उपसा करावा लागतो. यामुळे धरणातील पाणी कमी पडून तीव्र पाणी टंचाई निर्माण होते.

दरवर्षी पालिका पाच महिने अगोदरपासून नियोजन करीत पाणी जपून वापरण्याचे आवाहन करत असते. या वर्षीचा शिल्लक साठा पाहता पालिकेने  देहरंग धरणातून होणारा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

पनवेल शहराला ३२ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता आहे. यामध्ये  ११ एमएलडी एमजेपीकडून तर ६ एमएलडी एमआयडीसीकडून आणि १५ एमएलडी पाणी देहरंग धरणातून घेतले जाते. सध्या देहरंग धरणात १५०० एमएलडी पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जून महिन्यापर्यंत शिल्लक राहावा यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. हेही वाचा -

"सीरमसाठी भावनिक क्षण", पुनावाला यांनी शेअर केला टीमसोबत फोटो

‘फिल्मी स्टाईल’ने आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला
Read this story in English
संबंधित विषय